सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२८.११.१९
सातारा- वडजल ता. फलटण परिसरात एकाचा गळा चिरून खून झाल्याची माहिती समोर येत आहे. धारदार शस्त्राने गळ्यावर वार केलेले आहेत. खुनाचे कारण अद्याप समजलेले नाही. प्रकाश फोरमन पवार (वय ४०) रा. शिंदेवाडी नजीक साखरवाडी येथील पारधी समाजातील व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वडजलचे पोलीस पाटील विजयकुमार ढेंबरे यांनी ही खबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडजल ते भिलकटी या रस्त्यावर आबा ढेंबरे यांच्या शेतात पवार याचा मृतदेह आढळून आला. आपापसातल्या भाडंणावरून हा खून करण्यात आला असावा अशी शंका व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.



















