चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
चिमूर- तालुक्यातील ताडोबा बफर झोन लागत असलेल्या कोलारा या गावातील बफर रोड जंगल लगत लागून असलेल्या शेतात रात्री शेतकरी आपल्या पिकाची राखण (जागली) करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक पण केलेल्या हल्ल्यात बालाजी डोमा वाघमारे वय ६३ वर्षे रा कोलारा ह्या शेतकरी जागीच ठार झाला आहे, वाघाने बालाजी वर हल्ला केला त्यावेळी शेतात फक्त एकटेच होते जेव्हा वडील सकाळी घरी परत आले नाही त्या मुळे मुलांनी वडिलांचा शोध शेतात घ्या करिता गेले होते असे गावातील लोकांना सांगितले. गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर शेतकरी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण शेती वरच करतो तर शेती चे काम शुद्ध तेच बघायचे.



















