चंद्रपूर(निर्भिड न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०२.२०२०
नागभीड- तालुक्यातील वाढोणा येथील सरपंच सौ. मीना हेमंत मेश्राम यांना अप्पर विभागीय आयुक्त, नागपूर यांनी ३ सप्टेंबर चा दिलेला आदेश कायम ठेवत अप्पर सचिव महाराष्ट्र शासन(ग्रामविकास)पंचायत राज विभाग मंत्रालय, मुंबई यांनी अपात्र घोषित केले आहे.
वाढोणा ग्रामपंचायत च्या सरपंच मीना मेश्राम यांनी सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये अप्पर विभागीय आयुक्त, नागपूर यांनी ३ सप्टेंबर २०१९ च्या पत्रान्वये सरपंच मीना मेश्राम यांना अपात्र घोषित केले. परंतु तत्कालीन सरकार मधील ग्रामविकास राज्यमंत्री, मुंबई यांनी दिलेला आदेश खारीज करुन सरपंच मीना मेश्राम यांना पदावर कायम ठेवण्यात आले. परंतु तक्रार कर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने २८ जानेवारी रोजी सुनावणी होऊन अप्पर सचिव, महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय, मुंबई यांनी ४ फेब्रुवारी ला निकाल घोषित करुन राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे न्यायालयाने सरपंच मीना मेश्राम यांनी दाखल केलेले अपील खारीज केले. आणि यापूर्वी दिलेला अप्पर विभागीय आयुक्त, नागपूर यांचा निर्णय कायम ठेवत सरपंच मीना मेश्राम यांना अपात्र घोषित केले असून ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचेकडे सरपंच पदाचा प्रभार देण्याचा आदेश काढला. व त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचा आदेश दिला आहे.



















