वाहन पोर्टल देखभालीसाठी तात्पुरते बंद; ऑनलाइन RTO सेवा ठप्प…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी : स्वप्नील इंगळे
दि.२९.०६.२०२६
पिंपरी – वाहनधारक, वाहन विक्रेते, ड्रायव्हिंग स्कूल तसेच RTO संबंधित कामकाज करणाऱ्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावा लागत आहे. VAHAN 4.0 पोर्टल सध्या तांत्रिक देखभाल सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ऑनलाइन RTO सेवा सध्या बंद आहेत.
पोर्टल बंद असल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, परवाना, मालकी हस्तांतरण, हायपोथिकेशन, वाहन फिटनेस, टॅक्स भरणा तसेच इतर ऑनलाइन सेवा तात्पुरत्या स्वरूपात ठप्प झाल्या मुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना नियोजित कामांमध्ये विलंब होत आहे. मात्र संबंधित विभागाकडून पोर्टलवरील तांत्रिक देखभालीचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी RTO कार्यालयात अनावश्यक गर्दी करू नये, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तांत्रिक देखभाल पूर्ण होताच पोर्टलवरील सर्व ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू होतील, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.



















