विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि. २९.०७.२०२६
पिंपरी- पिंपरी-वाघेरे येथील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत बुधवार रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देणारी मनोगते व्यक्त केली. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. उपस्थितांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष पारधी सर, गाढवे सर, लांडगे मॅडम, मुलानी मॅडम, शिक्षकवृंद तसेच रघु भांडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाढवे सर यांनी केले, तर हारकळ सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



















