ढेबेवाडी:कै. आमदार आणासाहेब पाटील ग्रामविकास पॅनेल मंद्रलकोळे ग्रामपंचायत पंच वार्षिक निवडणूक सण 2018 ची आज वार्ड क्रमांक 1 मध्ये कोपरा सभा पार पडली.यावेळी बोलताना जि. प.सदस्य रमेश पाटील साहेब म्हणाले की गेली पाच वर्षे झाले ग्रामपंचायत चा कारभार चांगला चाला आहे कोणता ही काळा बाजार झालेला नाही असे बोलताना रमेश पाटील म्हणाले.तसेच आमच्या वडिलांनी मुंबई मध्ये लाखो लोकांना माथाडी मध्ये रोजगार मिळवून दिला.तोच आम्ही वारसा पुढे चालवतोय.आमच्या रक्तामधेच समाजकार्य करण्याचे आहे असे रमेश पाटील म्हणाले. तसेच पुढे म्हणाले की विरोधकांनी गेली 15 वर्ष फक्त सोथाची पोळी भाजून,किसे भरले आहेत अशी घणाघात टीका रमेश पाटील यांनी वार्ड क्रमांक 1 मध्ये सभेत केली.वार्ड 1 मधील सर्व उमेदवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन कै. आमदार आणासाहेब पाटील ग्रामविकास पॅनेल चे प्रमुख नेते जि. प.सदस्य रमेश पाटील यांनी केले.



















