नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०५.२०२०
नाशिक- मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक, विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था निलगिरी बाग नाशिक, कौशल्य विकास बहुउद्देशीय मंडळ कानडी, ऋणानुबंधन महिला व पुरुष हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र नाशिक, चाणक्य कलामंच नाशिक आणि वार्तापत्र शोधांश वार्ताहर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई भीमराव आंबेडकर स्मृतीदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश साळुंके मुख्य संपादक वार्तापत्र शोधांश पत्रकार हे उपस्थित होते. माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अर्पण करून भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्प व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. बुद्धवंदना नंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ.राजेश साळुंके यांनी माता रमाई यांच्या सर्व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. माता रमाई यांच्या जीवनपटावर माहिती देऊन त्यांच्या जीवनाचे स्मरण केले तसेच माता रमाई यांच्या जन्मापासून तर निर्वाणापर्यत संपूर्ण माहिती डॉ.राजेश साळुंके यांनी मनोगतातून व्यक्त केली. श्री साहेबराव वाळवंटे विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांनी देखील माता रमाई विषयी मनोगत व्यक्त केले. अलका शिंदे, रेखा दिपके यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनिल मोरे, अनिल पटेकर, सिद्धार्थ वाघमारे, संचालक संतोष वाळवंटे व महिला मंडळातील तारामती पुरंगे ,अलका गवळी, मंदा वाघमारे, पंचफुला वाळवंटे, वनिता वाळवंटे, विकास गायकवाड, सविता जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्वानी मोलाचे सहकार्य केले. अनिल मोरे यांनी मान्यवरांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाळवंटे यांनी केले.



















