नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.०२.२०२०
नाशिक- वैजापूर येवला राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केल्याने विकासासाठी चालना मिळणार असून, प्रवाशांसह शेतकऱ्यांना शेत माल व वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. जुन्या मुंबई जालना महामार्गाचे येवल्यापर्यंत चौपदरी करत असले तरी येवला ते वैजापूर हद्द रस्ता तीनपदरी असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण न होता सुलभ होण्यासाठी भुजबळांनी हा रस्ता चौपदरीकरान करण्याच्या सबंधित पत्र या संबधित विभागाला दिले आहे. जालना रस्त्यमधील नवीन राष्ट्रीय महामार्ग एन.एच.७५२ येवला ते येवला तालुका हद्द वैजापूर रस्त्याच्या चौपदरीकरनासह रस्ता दुभाजक, फूटपाथ, पथदीप आदी कामे करण्याचे आदेश दिल्याचे माहिती अंदरसुल उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनावणे यांनी दिली आहे निर्भिड पत्रकारला दिली.



















