सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१२.०३.२०२०
फलटण- शहरात काही दिवसापूर्वी एक व्यापारी व फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध फलटण तालुका व्यापारी संघटनेने आज उप विभागीय अधिकारी पोमण साहेब फलटण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की फलटण शहरातील मोबाईल विक्रेते व्यापाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असून योग्य ती खबरदारी घेऊन फलटण शहरातील व्यापारीवर्गावर होणारा अन्याय दूर करावा. फायनान्स कंपन्या व कर्जदार यांचा व्यापाऱ्यांचे कुठेही काडीमात्र संबंध नसतो केवळ वस्तू विक्री करणे हाच हेतू असून फायनान्स कंपनी कायदेशीर मार्गाने वसुली करत असते. कंपनीच्या वस्तीमध्ये व्यापार्यांचा कोणत्याही संबंध नसतो असे असतानाही काही समाजकंटक व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने खोटा गुन्हा दाखल करत आहेत. यामुळे फलटण शहरातील व्यापारी दहशतीखाली असून व्यापारी माणूस मानसिक दृष्टीने खचला गेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल न करता योग्य तो तपास करून पुढील कारवाई करण्यात यावी. आत्तापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्याची योग्य ती तपास करावा पुन्हा अशा स्वरूपाचे खोटा गुन्हा दाखल झाल्यास फलटण तालुका व्यापारी संघटनेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. असा इशारा यावेळी देण्यात आला.



















