शाळांपासून ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सह हाय-कॅफीन एनर्जी ड्रिंक विक्रीवर महाराष्ट्र सरकारची बंदी..
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, अमोल अभंग
दि.०४.०७.२०२६
मुंबई- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सह उच्च कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन (FDA) मार्फत करण्यात येणार आहे.
शाळांजवळ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या एनर्जी ड्रिंक्समुळे त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये जनजागृती अभियानही राबविण्यात येणार आहे.



















