महाबळेश्वर : दि.१९.०३.२०१८ प्रौढ साक्षर वर्गाचे उद्घाटन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे हस्ते समाज मंदिर नगरपालिका सोसायटी येथे करण्यात आले.या साक्षरता वर्गास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या प्रदेशाध्यक्षा छायाताई शिंदे,अनिता मोरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाहीन वारुणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी किरण शिंदे,श्वेता मोरे,सिंधू वने, सुनंदा रोकडे,सुमित कांबळे यांनी आपले विचार मांडले.शिक्षणाचे महत्व सांगताना किरण शिंदे यांनी शिक्षण हाच सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एकमेव उपाय असून त्यावर आपल्या सर्वांचा अधिकार आहे. तसेच शिक्षण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असे मत मांडले.या साक्षर वर्गास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शांताबाई जाधव या आजीने आपले नाव प्रौढ साक्षर वर्गात नोंदवून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला.यावेळी प्रौढ साक्षरता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना किरण शिंदे,सुमित कांबळे,अमोल काकडे यांचे हस्ते पाटी व पेन्सिलचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहीन वारुणकर यांनी केले.आभार शीतल कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास अरुणा काकडे,रेश्मा कांबळे,कविता मोरे,मधुमालती खरे,रेश्मा खरे,आकाश कांबळे,गोरखनाथ शिंदे,अनिकेत मोरे, सुरेखा कांबळे,संगीता कांबळे,रंजना कांबळे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















