सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०२.२०२०
लोणंद- वाळूचे दर गगणाला भिडल्याने तालुक्यात चढ्या भावाने वाळू विक्री केली जात असल्याने हे दर सर्व सामान्य लोकांना परवडणारे नाहीत. वाळूची टंचाई असल्याने अधिक दराने वाळू विक्री जोमाने सुरू आहे.हे व्यहारीक गणित आखून वाळू माफिया कार्यरत झाले आहेत. त्यातच हिगणगाव सासवड रोड भोरकरवाडी येथील शेतकरी नामदेव तुकाराम अनपट,सुखदेव तुकाराम अनपट, हरिदास तुकाराम अनपट यांनी लोणंद पोलिसात गणेश भगवान गायकवाड याच्या विरोधात शेतातील पंधरा ते विस ट्रॅक्टर ट्राॅली वाळू चोरल्याची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.या वेळी आरोपी वाळू चोरत असतानाचे ट्रक्टरसह फोटोही आपल्याकडे असल्याचे तक्रारीत अनपट यांनी म्हटले आहे.तक्रार देवून आठवडा उलटूनही कोणतीही कारवाई तर झाली नाहीच परंतु साधी विचारपूसही पोलिसांनी केली नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शेतकऱ्याच्या शेतात घडलेल्या वाळू चोरीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत असून यावर पोलीस कधी आणि काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर संबंधित आरोपी वाळु माफिया असून आर्थिक देवाण घेवाण होऊन पोलीस कारवाई करणार नाहीत अशी देखील चर्चा ऐकावयास मिळत आहे.त्यामुळे या चोरी प्रकरणी लोणंद पोलीस काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



















