आष्टी तालुका प्रतिनिधी (प्रफुल्ल जाधव)
तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.ग्रामपंचायत येथे संदीप खाकाळ,उपसरपंच दीपक सोनावणे,अन्य ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्त यांनी डॉ.आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून आभिवादन केले तर दुसरी कड़े जाधववस्ती येथे सालाबादप्रमाने या ही वर्षी डॉ.आंबेडकर जयंती थाटात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.या निमित्त सकाळी नील ध्वजारोहण, रांगोळी, सामुहीक बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यांत आले.या प्रसंगी माजी सरपंच पत्रकार रामदास जाधव,बाबासाहेब जाधव,सदाशिव जाधव,ज्ञानदेव जाधव,किशोर जाधव,गौतम जाधव,हौसराव गायकवाड़,भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल जाधव,उपाध्यक्ष सचिन जाधव सचिव कु,भाग्यश्री उपसचिव,प्रसाद जाधव,प्रतिक जाधव,सुदर्शन जाधव, दीपक जाधव,प्रदीप जाधव,अशोक जाधव आदि उपस्थित होते.रात्री अन्नदान व भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



















