सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०५.२०२०
★येरफळे गावातील शेतकऱ्यांना मास्कचे वाटप
पाटण- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना (व्हायरस) ने अनेक जणांचा बळी घेतला आहे. यावर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. कोरोना पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रादुर्भावामुळे होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन संघर्षाला साथ हवी या सामाजिक व शैक्षणिक काम करणाऱ्या ग्रुपच्या माध्यमातून दि. २० मे रोजी सायंकाळी ७ वाजता येरफळे गावात दररोज दुध घालण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून मास्क वाटप वेळी शेतकऱ्यांना शोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे दोन व्यक्तींमध्ये कशा पद्द्तीणे डिस्टन्स ठेवावा या बद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे ही आवाहन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करा असेही यावेळी सांगण्यात आले या अभिनव उपक्रमाचे शेतकरी वर्गातून या ग्रुपचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे. मास्क वाटप वेळी सतीश पाटील (सर), नितीन पाटील, विकास पडवळ, केतन पडवळ, दत्तात्रय पडवळ, सूरज मोळावडे, आनंदा पडवळ व संघर्षाला साथ हवी या सामाजिक व शैक्षणिक काम करणाऱ्या ग्रुपचे सर्व सदस्य उपस्तीत होते.



















