सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी
दि.१७.०३.२०२०
सातारा- दुबई येथून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ६ वर्षीय मुलीस अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तिला कोरडा खोकला असल्यामुळे तिच्या घशातील स्त्रावाचे नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. तिचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने ती मुलगी कोरोना बाधित नसल्याची माहिती डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जनतेनी कोरोनाच्या बाबतीत भीती न बाळगता दक्ष रहावे, तसेच जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.



















