पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.१२.०७.१९
मावळ- तालुक्यातील सांगवडे आठ दिवसा पासुन बिबट्याचा दहशतीखाली असलेल्या गावात वन विभागाचे अधिकारी आज पाहणी करण्या करता आले होते. त्या मध्ये वन रक्षक दलाच्या वाघमारे मॅडम व वनपाल ढेंबरे सर आले होते.आता पर्यंत वाघ का बिबट्या हे सिध्द झाल नाही. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठसे पाहुन बिबट्या असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पायांचे ठसे आकुर्डी येथील प्राणी सर्वक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्रात तपासणी साठी पाठवले आहेत.वन अधिकारी यांनी गावकऱ्यांसह गावातील शिवारात फिरुन पाहणी केली त्यावेळेस अर्धवट खाललेली कुत्र्याची बॉडी दिसली.शिवारात पाहणी करत असताना गावचे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशभाऊ राक्षे, प्रविण राक्षे, तुकाराम राक्षे, सोमनाथ राक्षे, गेनाभाऊ लिमन, जालिंदर लिमन, बाळासाहेब मोकाशी, सतिश राक्षे, चंद्रकांत आमले, निलेश राक्षे, संकेत जगताप आदी ग्रामस्थ मदती साठी उपस्तित होते.



















