सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१५.३.२०२०
• “कोरोना’ला प्रतिबंधक करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. अशा दहा जणांना त्यांच्या घरामध्येच १४ दिवसासाठी थांबण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
सातारा- जिल्ह्यात अबुधाबी येथून आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याला तातडीने विलगीकरण कक्षात ठेवले असून या संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही संस्थेकडे पाठविले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.



















