नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०२.२०२०
येवला- सारथी क्लासेस वतीने इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयाची भीती कमी करण्यासाठी “मोफत मार्गदर्शन सेमिनार” अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सेनापती तात्या टोपे सार्वजनिक वाचनालय भोई गल्ली येवला येथे आयोजन करण्यात आले होते. सेमिनारच्या सुरूवातीस प्रा.प्रमोद गायकवाड सरांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला. सेमिनार मधे परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे कसे जावे? कमीत कमी वेळेत अभ्यास कसा करावा? पेपर कसा लिहावा व दोन्ही विषयांच्या महत्त्वाच्या घटकांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमा साठी सौ.शुभांगी गायकवाड क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.



















