सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१५.३.२०२०
फलटण- नवविवाहितेनी सासरच्या जाचाला कंटाळून विष प्रशान करून केली आत्महत्या केल्याची घटना फलटण तालुक्यातील गिरवी या गावामध्ये घडलेली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की सौ पूजा सतीश कदम वय वर्ष २३ रा. गिरवी ता. फलटण जिल्हा सातारा या मुलीचे लग्न १ महिन्यापूर्वी दिनांक १ फेब्रुवारी रोजी जिजाऊ मंगल कार्यालय फलटण येथे सतीश अरविंद कदम रा.गिरवी ता. फलटण यांच्याबरोबर झाले होते त्यानंतर चार दिवसापूर्वी पूजाने तिची आई उमा यांच्या फोनवर फोन केला असता घडलेला सर्व प्रकार तिच्या आईस सांगितला कि मला माझ्या सासरी माझा नवरा सतीश अरविंद कदम, सासरा अरविंद नानासो कदम. सासु मंगल अरविंद कदम. हे असे म्हणत आहेत की तुझ्या आई-वडिलांनी लग्नात हुंडा तसेच मान. व्यवस्थित दिला नाही म्हणून मला शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देत असून मला मारहाण करत आहेत तरी तुम्ही मला घेवून जावा असा फोन पूजा हिने तिच्या आईचा केला होता . मात्र होळी व धुळवडी सण झाल्यानंतर तुला घेऊन येतो असं सांगितलं होतं त्यानंतर दिनांक १३ मार्च रोजी पूजा च्या वडिलांना असं समजले की मुलगी पूजा ही तिच्या पाथरी गिरवी तालुका फलटण येथे कीटक नाशक औषध पिल्याने तिला दवाखान्यात ऍडमिट आहे असे कळल्याने मी मुलीस फोन केला त्यावेळी तिचा फोन बंद असल्याचे जावई सतीश यास फोन केला परंतु त्याने उचलला नाही त्यानंतर पूजाचे वडील दत्तात्रय निंबाळकर आई उमा व चुलते प्रताप निंबाळकर केडगाव ता.जि.अमहदनगर येथून पुजास काहीतरी झाले असावे म्हणून दि.१४ मार्च रोजी सकाळी फलटण येथे आले असता त्यांना असे समजले की पुजारी डॉ.पोळ यांच्या दवाखान्यात आहे, त्यानंतर आम्ही डॉ.पोळ यांच्या दवाखान्यात गेलो असता पूजाही दवाखान्यात मयत झाल्याची दिसले. त्यानंतर पुजा पोस्टमार्टम करण्यासाठी तिला उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे येऊन गेले होते पूजा, हिला तिचा नवरा सतीश अरविंद कदम, सासरे अरविंद नानासो कदम ,सासु मंगल अरविंद कदम, यांनी लग्नात हुंडा तसेच मान व्यवस्थित केला नाही म्हणून या सर्वांनी तिचा वेळोवेळी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने तिला तिचं जगने असाह्य झाल्याने त्यांच्या त्रासास कंटाळून तिने कीटकनाशक प्रशान केले असल्याची तक्रार दत्तात्रय निंबाळकर वय ५५ वर्ष व्यवसाय व्यापारी रा लिकरोड माधव नगर केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.



















