सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक चांगली होती. तसाच त्याला उठावही तसाच मिळाला. वांग्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. वांग्याची आवक स्थानिक भागातून जास्त होती. बाहेरील आवक कमी होती. गेल्या काही दिवसांपासून वांग्याला चांगला उठाव मिळतो आहे. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
या आधीच्या आठवड्यातही वांग्याची आवक तशी जेमतेम १० ते २० क्विंटल प्रतिदिन होती. पण दरही जैसे थे होते. प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही दर आणि आवकेची परिस्थिती काहीशी अशीच होती. आवक ४० ते ६० क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर होता. २०० ते ३०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर टिकून होते.



















