सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
सोलापूर- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्र वरील निकाल आज राखून ठेवला आहे. त्याच सोबत सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
आज भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे वकील यांनी सादर केलेले अहवाल मान्य नाहीत असे सांगत त्यांनी दाखल केलेले सर्व अर्ज जात प्रमाणपत्र समितीने फेटाळले आहे व येत्या चार ते पाच दिवसात निकाल देण्यात येईल असे स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
अध्यक्षांनी सुनावणी पूर्ण झाली आहे आणि निकाल येत्या चार ते पाच दिवसात देण्यात येईल असे सांगताच तक्रारदार प्रमोद गायकवाड , विनायक कंदकुरे, मिलिंद मुळे खा. जयसिद्धेश्वर महास्वामी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या जात प्रमाणपत्र सुनावणी कडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिल आहे.



















