नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.२२.०३.२०२०
येवला- सौदी अरेबियातून आलेला आणि लोजी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण शहरात आल्याचे वृत्त कळताच प्रशासनाची धावपळ उडाली, येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि. २०) त्याची तपासणी केली तो निगेटिव्ह असल्याचे सांगत घरी सोडण्यात आले.
येवल्यात सहा व्यक्ती सौदी अरेब,लंडन, दुबई, जर्मनी,अमृतसर,येथून परतल्या आहे. या सर्वांची प्रकृती उत्तम असून करोनाची कुठलीही लक्षणे दिसत नसल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे. मुंबई विमातळावर सौदी अरेबियाहून आलेल्या ५५वर्षीय नागरिकाचे १३मार्चला स्क्रिनिंग झाले होते. १५ मार्चला स्वसणाचा त्रास होऊ लागल्याने तो प्रवारा मेडिकल हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. त्याला दीर्घकाळापासून फुफुसाचा आजार असल्याचे तेथे निष्पन्न झाले. करोणाची लक्षणे असल्याची शक्यता गृहीत धरून त्याला नगर येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. प्रवारा हॉस्पिटलमधून निघून आला होता. याची माहिती गुरुवारी रात्री शहरात समाजात पोलिसांची धावपळ उडाली. रुग्ण घरी नसल्याचे सांगण्यात आल्याने अजूनच संशय बळकावला. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, हवालदार चंद्रकांत निर्मल यांनी निवासस्थानी माजी नगरसेवक रिजवान शेख यांना बोलावून सबंधित कुटुंबाला समजाऊन सांगितले की त्या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शालेजा कुप्पास्वामी यांनी रुग्णाची तपासणी केली त्याला करोनाची कुठलीही चिन्हे नसल्याचे सांगत दुपारी घरी सोडण्यात आले.
• आमच्याकडे तपासणीसाठी आलेल्या संबंधित रुग्णाला गुफुसाचा आजार आहे. त्याला ताप व खोकला येत नसल्याचे करोनाची लक्षणे दिसली नाही.असा त्याला आम्ही १४ दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. काही त्रास झाल्यास तत्काळ संपर्क करण्याचे सांगितले आहे.
वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय येवला



















