पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अतुल गंभीरे
पुणे, मनपाच्या ५३ इंग्रजी शाळेतील हंगामी तत्वावर असलेल्या शिक्षकांचे बेमुदत पुणे मनपा समोर बेमुदत धरणे आंदोलन २०१५ सालापासून पुणे मनपा शाळेमध्ये रुजू असलेल्या हंगामी २१८ शिक्षकांची अशी मागणी आहे की शासनाने आम्हाला कायमस्वरूपात नोकरीत ठेवावे व वेतन वाढवावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.काल पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांची आंदोलन कर्त्यांनी भेट घेतली असता आयुक्तांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना म्हणले जर तुम्हाला काम परवडत नसेल तर तुम्ही घरी जाऊ शकता.व निराश होऊन शिक्षकांनी पुन्हा मनपा समोर आंदोलनाला बसले.तसेच आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार.व पुढील काही दिवसात आम्ही बेमुदत उपोषण चालू करू असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.



















