हॉटेलच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून ६० हजारांची चोरी; १८ वर्षीय आरोपी अटकेत
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, देवाम्मा ददली
दि.०४.०७.२०२६
पिंपरी- काळेवाडी परिसरातील शिवकल्याण भोजनालय हॉटेलच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून सुमारे ६०००० हजारांची रोकड चोरी करणाऱ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत १८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीकराव विश्वासराव भोसले (वय ५३) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे शिवकल्याण भोजनालय, एम.एम. चौक, काळेवाडी येथे २९ जून रोजी रात्री १० ते ३० जून सकाळी १०.३० या कालावधीत चोरी झाली.
अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील तसेच गल्ल्यातील मिळून सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शंकर सोपान सगर वय १८, रा. भोरडे बिल्डिंग, जगताप नगर, थेरगाव याला अटक केली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



















