पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०२.२०२२
पुणे- महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्टी संस्थेचे उपायुक्त तथा विभाग प्रमुख श्री.उमेश सोनवणे यांनी वणंद या महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थानी जाऊन अभिवादन केले. यावेळी दापोली समता दूत महेश्वरी विचारे या उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे त्यागमूर्ती महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या

प्रतिमेस श्री.सुमेध थोरात प्रकल्प व्यवस्थापक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.शफी शेख प्रकल्प व्यवस्थापक, श्रीमती रजनी वाघमारे प्रकल्प अधिकारी, श्रीमती सुनंदा गायकवाड प्रकल्प अधिकारी, श्री.रामदास लोखंडे, श्री.विजय पवार आदी उपस्थित होते. श्रीमती रजनी वाघमारे यांनी माता रमाईच्या जयंती निमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. वाडिया कॉलेज पुणे येथील महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या

पुतळ्यास बार्टी संस्थेच्या वतीने श्री.सुमेध थोरात, श्री शफी शेख, श्रीमती रजनी वाघमारे, श्री.श्रीमती सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचे मुख्य समन्वयक श्री.विठ्ठलदादा गायकवाड यांच्या हस्ते श्री.सुमेध थोरात पुणे यांना पंचशील शाल व धम्मपद हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री.रामदास लोखंडे, श्री विजय पवार आदी उपस्थित होते.



















