पत्रकार उत्कर्ष संघ उपाध्यक्षपदी डॉ खंडू माळवे यांची निवड
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, देवम्मा ददली
दि. २३.०५.२६
पुणे- कवी, लेखक, साहित्यिक, वृत्तपत्रलेखक व मुक्त पत्रकारांसाठी स्थापन झालेल्या पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक व मुक्तपत्रकार राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू रघुनाथ माळवे यांची बहुमताने निवड करण्यात आली. कामाठीपुरा विभागातील श्री दत्तगुरू प्रतिष्ठान सभाग्रहात सल्लागार श्री लियाखत अल्ला सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह, कार्यकारणी व विविध समित्यांसाठी निवड करण्यात आली. प्रास्ताविक भाषण राजेंद्र लकेश्री यांनी केले. स्वरचंद्रिका आशाताई भोसले तसेच संघाचे सदस्य श्री. प्रकाश बाडकर, बबन जोशी, हरियाणा, गणेश नेतिकर इत्यादीना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर झालेल्या रितसर कार्यकारिणी निवडमधे सर्वश्री राजेंद्र लकेश्री अध्यक्ष डॉ खंडू माळवे श्री मुक्ताताई फोपेरे,यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.श्री दत्ताराम वंजारे, यांची सरचिटणीस तसेच राजेश्वर जोगू व शाहिद मुल्ला यांची अनुक्रमे चिटणीसपदी निवड. तसेच अशोक परब यांची खजिनदारपदी तर हिसोब तपासणीस भाबय्या गुंडावैना यांची निवड झाली.
कार्यकारणी सदश्य म्हणून म्हणून रामदास गजरे, हेमंत अनुमाला, भालचंद्र डफल,वसंत चिलवेरी व विश्वनाथ भ. तळेकर यांची एकमताने तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.



















