पुणे शहरात ९ जुलै रोजी संतांच्या पालख्यांचे आगमन; पोलीस प्रशासन सज्ज
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, मयूर चव्हाण
दि.०४.७.२०२६
पुणे – दरसालप्रमाणे यंदाही श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्या ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात दाखल होणार आहेत.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने संपूर्ण पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, गर्दी नियंत्रण तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



















