आनंद नगर एस.टी. कॉलनीतील सांडपाणी प्रश्नावर तात्पुरता दिलासा
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.११.०९.२०२६
वाघोली – आनंद नगर एस.टी. कॉलनी, वाघोली येथील सांडपाणी गटाराच्या गंभीर समस्येची पाहणी करण्यासाठी स्थानिक भाजप नेते व वाघोली गावचे माजी उपसरपंच श्री. संदीप (आबा) सातव, संघटन सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हा यांनी आज भेट दिली.
यावेळी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून आठ दिवसांच्या आत सांडपाण्याचे योग्य नियोजन करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच तात्पुरत्या स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेबद्दल आभार मानले.



















