पुणे : दि.०६.०४.१८ आज येथे वृत्तपत्र “निर्भीड पत्रकार”च्या प्रथम आवृत्तीचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.सामान्य जनतेच्या,शेतकऱ्यांच्या,मजुरांच्या,अन्यायग्रस्तांच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी निर्भीड पत्रकार ची निर्मिती केली असल्याची माहिती बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली.तर या वृत्त पत्रासाठी अथक परिश्रम घेऊन संचालक नंदकुमार जोगदंड व संदीपभाऊ जोगदंड यांनी निर्भीड पत्रकारची संकल्पना प्रत्यक्षात आणली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.संदीप जोगदंड यांनी निर्भीड पत्रकार निःपक्षपाती पणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून देशाच्या विकासात भर पाडेल अशी आशा व्यक्त केली.तर नंदकुमार जोगदंड यांनी निर्भीड पत्रकारची टीम ही अत्यंत अनुभवी टीम असल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा व्यक्त केली.यावेळी रघुनाथ कदम,शुभम सोंडे,अमित माने,केतन जगताप,सुमित गायकवाड यांनी टीम निर्भीड पत्रकारचे पहिल्या अंकाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले.यावेळी किरण शिंदे यांची संपादक पदी नेमणूक केल्याची घोषणा नंदकुमार जोगदंड यांनी केली.या प्रसंगी उपस्थित प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास किरण शिंदे,संदीपभाऊ जोगदंड, नंदकुमार जोगदंड,शिरसाठ,हिरा दलालकर,सुमित गायकवाड, जाधव,केतन जगताप,कुणाल जगताप,रघुनाथ कदम,अमित माने,कांबळे,शुभम सोंडे,विकास ओव्हाळ,रवींद्र गायकवाड यांचेसह निर्भीड पत्रकारकचे,संपादक मंडळ व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निर्भीड पत्रकारच्या टीमवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



















