पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
देहूरोड- देहू माळवाडी गावाततील रहिवासी शुभास परांडवलयांच्या शेतालगत असलेल्या विहिरीमध्ये खाण्याच्या शोधत असताना २ घोणस सर्प खोल विहिरीत पडले होते. त्या ठिकाणी तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ (पुणे) संस्थेचे नयन कदम, निनाद काकडे , रितेश साठे, सूरज शिंदे व रोहन ओवाळ हे दाखल झाले. गाव वाल्यांनी दिलेल्या माहिती नुसार ते सर्प सुमारे १५ ते २० दिवस कोरड्या विहिरी मध्ये पडले असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र व प्राणीमित्र यांनी मोठ्या शिताफीने त्यास विहिरी मध्ये उतरून सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर २ घोणस जातीचे सर्प सुमारे ४ फूट लांबीचे (नर व मादी) यांस जीवदान दिले. त्याला वाचवण्यासाठी दोरीच्या साहाय्याने सुमारे ८० ते १०० फुट खोल विहिरीत उतरून त्यास तात्काळ बाहेर काढून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले.या आधी सुद्धा वन्यजीव रक्षक मावळ संस्था ( पुणे ) च्या सदस्यांनी अनेक वन्यजीवांना जीवदान दिले आहे. तरी त्यांनी केलेल्या सहकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.



















