पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.१२.१९
पुणे- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनिया गांधी यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे सेवाउपक्रम हा कार्यक्रम वृद्धाआश्रम येथे घेण्यात आला. बिजलीनगर येथील मातृसेवा सेवाभावी संस्था या वृद्धाआश्रमामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते गहू तांदूळ, आटा, साखर डाळी इ धान्य तसेच साड्या , कपडे, औषधे, खाऊ व इत्यादी साहित्य देऊन संस्थेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुहास गोडसे, कु. स्वरा गोडसे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, प्रदेश युवक कॉग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपणर, सेवादलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रशेखर जाधव, वसीम शेख, कुंदन कसबे, गौरव चौधरी, विशाल कसबे, चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, जिफिन जॉन्सन, स्नेहल गायकवाड, स्वप्निल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















