पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
पुणे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( अा) पुणे शहर च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त गंजपेठ येथील महात्मा फुले वाड्यावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता आठवले होत्या. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास राज्याचे महिला आघाडी उपाध्यक्षा संघमित्रा गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेंद्र कांबळे म्हणाले क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांच्या मुळे आज देशातील विविध क्षेत्रात महिलांना मोठे स्थान मिळाले आज अनेक सावित्रीच्या लेकी राष्ट्रपती, पंतप्रधान, कलेक्टर, डॉक्टर, वकील अशा विविध पदांवर विराजमान आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या अभिवादन सभेमध्ये महेंद्र कांबळे , माजी नगरसेवक जयदेव रंधवे, ॲड. चित्रा जानगुडे , सोनू खुडे, रमेश ठोसर, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, सदानंद कडलक , संजय कांबळे, विक्रम आल्हाट ,आरती देठे, दत्ता भिसे, माया थोरात, कुंदन सोनवणे, गणेश लोणारे, शांताबाई बनपट्टे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



















