पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०१.२०२०
पुणे- नव्याने लावलेल्या खांबावर पथ दिवे लावतांना शॉक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी नजीकच्या माण इथं घडली.
सागर आयप्पा माशाळकर (वय २०), सागर कूपु पारंडेकर (१९) राजू कुपु पारंडेकर (३५) अशी मृतांची नावे आहेत. तर, अन्य एक जण गंभीर जखमी आहे.
वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहिती नुसार, कामगार रस्त्यावर नव्याने लावलेल्या खांबावर दिवे बसवण्याचं काम करत होते. यावेळी शिडी वीजप्रवाह सुरू असलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे चार कामगारांना शॉक लागला. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीवर वाकड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



















