पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२६.१२.१९
शिक्रापूर- १ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर वढू बु।। ला रजनीश शेठ अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांनी भेट दिली.यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुहास वारके, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचेसह अधिकारी उपस्थित होते.गोविंद गोपाळ यांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांनी अतिरिक्त महासंचालक यांचे स्वागत करून नियोजना बाबतीत चर्चा केली.१ जानेवारी जयस्तंभाला सलामी देण्यास येणारे आंबेडकर अनुयायी वढू बु।। येथील गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीस भेट देत असतात गेल्या वर्षी तीन लाख भीम अनुयायी या स्थळी भेट देऊन गेले होते.यावर्षी येणाऱ्या भीमसैनिकांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



















