पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०२.२०२२
मुळशी- आमदार संग्राम थोपटे यांनी शुक्रवारी पीएमआरडीए चे आयुक्त श्री.सुहास दिवसे साहेब यांचेसमवेत भोर व मुळशी संघातील विविध कामांचे संदर्भात भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने पीएमआरडीए अंतर्गत विविध विकास कामे तसेच मंजूर घरकुलाना तत्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा याबाबतीत चर्चा झाली. या बैठकीला मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पीएमआरडीए चे सदस्य सुखदेव तापकीर, भुगावच्या सरपंच सौ.निकीता सणस, बाजार समिती सदस्य शिवाजी तांगडे, नांदे गावचे मा.सरपंच प्रशांत रानवडे, ग्रा.पं.सदस्य श्रीकांत तापकीर, मा.सरपंच राहुल शेडगे, राहुल तापकीर, शरद शेंडे, रमेश सणस आदि उपस्थित होते.



















