पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०३.२०२०
पुणे- कोरोना व्हायरसमुळे आपल्या शहरात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या नऊ वर पोहचली आहे.त्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातचित्रपट गृहे, उद्याने, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील पान टपऱ्याही काही दिवस बंद करण्यात याव्यात, कारण शहरात काही नामांकित अशा पान टपऱ्या आहेत तसेच एस.टी स्टॅन्ड, कॉलेजेस याठिकाणी जवळपास ५० – ५० लोकं येऊन गर्दी करतात, त्यामुळे त्याठिकाणी जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून अन्न पुरवठा विभागातर्फे विशेष पथकनेमूण तशी यंत्रणा राबवावी व जे पान टपरी धारक “पान टपरी बंद” करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात ज्या ज्या ठिकाणी “पान टपरी” आहेत, त्या त्या ठिकाणी गोवा, गुटखा, सिगारेट, पान या गोष्टींचे अधिकसेवन करतात त्यामुळे याचठिकाणी अधिकचे धुम्रपान होते. गोवा, गुटखा व पानखाल्ल्यानंतर लोक सर्वत्र ठिकाणी थुंकतात. “कोरोना व्हायरस” हा संसर्गजन्य आजार आहे असे म्हटले जाते. त्यामुळे जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेलतर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही धुम्रपान करण्याचेप्रमाणही शहरात जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी तर अधिकृत स्मोकिंग झोन चं आहेत.त्यामुळे त्यातूनही येणाऱ्या धुराद्वारे जो धुम्रपान करत नाही, त्या सामान्यमाणसाला देखील संसर्ग होऊ शकतो.
यावेळी नगरसेविका सौ. सुलक्षणाशिलवंत धर, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा सौ. गंगा धेंडे, नगरसेविका सौ.अनुराधागोफणे, नगसेविका निकिता कदम, नगरसेविका सुमन पवळे उपस्थित होत्या.



















