पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी,
विश्रांतवाडी, भारतीय बौद्ध महासभा, पुणे शहर अध्यक्षा आयु. रोहिणीताई टेकाळे ह्यांचे सासू तसेच पाक्षिक “प्रबुध्द भारत” चे व्यवस्थापक आयु विलासदादा टेकाळे ह्यांचे आई आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या कालकथित रंजनाबाई लालासाहेब टेकाळे यांचे सोमवार दिनांक १०/१२/२०१८ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. विश्रांतवाडीतील स्मशानभुमी येथे सायंकाळी ५.००वाजता विद्युत दाहिनीवर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला या माध्यमातून लाकडांचा होणारा अपरिहार्य वापर व पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोडीला आळा बसावा असाही संदेश या छोट्याश्या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आला. दि. ११/१२/१८ रोजी सकाळी ९.००वाजता अस्थी संकलन, अस्थी पूजन करण्यात आले व अस्थी कोणत्याही नदीपात्रात विसर्जीत न करता कालकथित रंजनाबाई लालासाहेब टेकाळे यांनी स्वतः तयार केलेल्या आंब्याच्या कोईपासूनच्या रोपट्याचे वृक्षरोपन लोहगाव येथिल पठारे वस्ती येथे करण्यात आले. वृक्षरोपन करण्याआधी वृक्षाच्या मुळाशी अस्थी विसर्जीत करुन त्यावर त्या रोपट्याचे वृक्षरोपन करण्यात आले.वृक्षरोपन करताना टेकाळे कुटुंबातील सर्व नातेवाईक, जवळील हितसंबंधी व मित्रपरिवार उपस्थित होते त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष मा.अतुल बहुले उपस्थित होते.



















