पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०२.२०२२
चाकण- नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत येथे दोन पादचाऱ्यांचे मोबाईल फोन हिसकावले. या दोन्ही घटना सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजताच्या कालावधीत घडल्या. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात साईनाथ लक्ष्मण राजुरे वय ३७, रा. येलवाडी, ता. खेड हे नाणेकरवाडी येथील सुदाम्याचे पोहे इमारतीच्या समोरून फोनवर बोलत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेला. दुस-या प्रकरणात विशाल धनकुमार राम वय २२, रा. निघोजे हे आळंदी फाट्याकडे चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी यांच्या हातातून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.



















