पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,अनिकेत जगताप
दि.१०.०७.१९
मावळ- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवडे व अंगणवाडी या दोघांनी मिळून ECA च्या समितीच्या मुलांनी संपूर्ण गावात वृक्षदिंडी काढून जनजागृती केली. ढोल ताश्याच्या गजरात ह्या मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले यामध्ये प्रामुख्याने गावकऱ्यांनी सहभाग घेतला तसेच अंगणवाडी सेविका मोकाशी ताई, मदतनीस राक्षे ताई तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्रीधर उतेकर,संदीप सकपाळ, आणासाहेब ओहोळ, स्वाती जगताप,उर्मिला सिरसाट,आदी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.



















