पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०६.२०१९
कोंढवा- पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे.या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु आहे. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या.परंतु रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. आसपासचा परिसरातील जमीन खचली, ज्यामध्ये मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत.या दुर्घटनेत आलोक शर्मा २८वर्षे,मोहन शर्मा २०वर्षे अजय,शर्मा १९वर्षे, अभंग शर्मा १९वर्षे,रवि शर्मा १९वर्षे,लक्ष्मीकांत सहानी ३३वर्षे, अवधेत सिंह ३२वर्षे,सुनील सींग १९वर्षे,ओवी दास ६वर्षे(लहान मुलगा),सोनाली दास २वर्षे(लहान मुलगी),विमा दास २८वर्षे,संगीता देवी २६वर्षे मृत्यू पावले आहेत तर पूजा देवी २८वर्षे जखमी झाले.



















