प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न बूमरँग होतो, केंद्रिय राज्यमंत्री मोहोळ यांचा इशारा
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, सुमित गायकवाड
दि.१५.११.२०२४
▪️आमदार सुनिल टिंगरेंना विजयी करण्याचे आवाहन
पुणे- पुणेकर नेहमीच विकासाला आणि भविष्याला मत देतात. कुणी प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास तो बूमरँग होतो, हे लक्षात ठेवा असा इशारा केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांचे नाव घेता दिला. महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे शंभर टक्के निवडून येणार आहेत. तुम्ही त्यांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही मोहोळ यांनी केले.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोहोळ बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, लोहगाव विमानतळाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा लोकसभा निवडणुकीवेळी लोहगावकरांना दिलेला शब्द मी पाळला आहे. केंद्रात त्यावर लवकरच शिक्का मोर्तब होईल. राज्यात महायुतीचे नेते एक दिलाने काम करीत आहेत. महायुतीचा धर्म पाळून आमदार टिंगरे यांना निवडून देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील. वारं बदललं आहे. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे वैयक्तिक टीका केली जात आहे. पदाधिकार्यांनी मनात किंतू परंतु न ठेवता काम करायचे आहे. तुम्ही एका अण्णांना लोकसभेत पाठवले आहे. आता दुसर्या अण्णांना विधानसभेत निवडून द्या. जगदीश मुळीक विधानपरिषद परिषदेवर गेल्यानंतर वडगावशेरीला दोन आमदार मिळणार आहेत.
तर मुळीक यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विरोधक पसरवीत असलेल्या अफवांवर लक्ष देऊ नये. सुनील टिंगरे आणि मी दोघेही महायुतीचे उमेदवार आहोत, असे समजून काम करा असे सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी पठारेंकडून महिला सन्मानाचा शब्द घ्यायला हवा होता- सुरज चव्हाण
येरवडा येथील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघातासारखी घटना घडल्यास पठारे यांनी पोलीस स्टेशनला न जाता अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, असा शब्द पठारेंकडून व्यासपीठावर घेतला होता. पठारेंकडून असा शब्द घेण्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी महिलांवर अत्याचार होणार नाहीत आणि झाले तर पोलीस स्टेशनला जाईल, असा शब्द त्यांच्याकडून घ्यायला हवा होता. अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बापू पठारेंवर केली.
अफवा आणि बिर्याणीला बळी पडू नका- सुनील टिंगरे



















