पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७०२.२०२२
राजगुरूनगर- खेड बाजूकडून चांडोली बाजूकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या बसने पादचार्यास धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना राजगुरुनगर येथे घडली आहे. पवन रमेश गाडे वय १८ वर्षे रा.चांडोली ता.खेड हा तरुण या आघातात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बस चालक महादेव साहेबराव सावंत रा.काळेवाडी ता.हवेली मूळ रा. सातारा याच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.



















