पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०२.२०२२
पुणे- बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे तो थोडक्यात बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित कैलास थोपटे याने तक्रार दिली आहे.



















