पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.११.०७.१९
मावळ- तालुक्यातील सांगवडे गावातील गावकरी सध्या वाघाच्या दहशती खाली आहेत.एक आठवड्या पासुन गावातील कोंबड्या, कुत्री, गायब होत होती गावातील सगळे ग्रामस्थ घाबरून गेले आहेत.सध्या शेतातील काम चालु आहेत.परंतु वाघाच्या दहशती मुळे गावातील लोक घराच्या बाहेर पडायला घाबरत आहेत.आज (दि.११ गुरुवार)रोजी सांगवडे गावचे ग्रामस्थ संकेत जगताप हे किवळे गावातुन सांगवडे गावात जात असताना.त्यांना सांगवडे गावच्या हद्दीत वाघ आढळुन आला.त्यांनी लवकरात लवकरात गावात हि गोष्ट सांगीतली.गावातील ग्रामस्थांनी पवना नदीच्या कडेला.शोधन्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत कुठेतरी वाघ लपला.कुठलाही गैर अथवा अनुचीत प्रकार घडण्या अगोदर वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती गावकऱ्यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधींशी बोलताना दिली.



















