पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.१२.१९
मावळ- तळेगाव दाभाडे मावळ प्रबोधिनीच्या वतीने ग्रामीण भागातील युवकांकरिता शेतीपूरक व्यवसायातील कुकुटपालन व्यवसायाचे १० दिवसांचे प्रशिक्षण वराळे येथील रूडसेट संस्थेत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिम्मित आयोजित केले. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी अटलजींच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.
आपण करीत असलेला व्यवसाय अथवा उद्योग यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन आणि त्यासाठी कष्ट आणि चिकाटी याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारतीय यांनी केले. मावळ प्रबोधिनी आणि रूडसेट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वराळे येथील रूडसेट संस्थेत कुकुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाचे उदघाट्नप्रसंगी भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारतीय बोलत होते.
मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शेती पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण तसेच शहरी भागातील उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी मावळ प्रबोधिनी विशेष परिश्रम घेणार असल्याचे तसेच हा स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षण अखंडपणे चालू ठेवण्यात येणार असल्याचे संस्थापक रविंद्र (आप्पा) भेगडे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रविंद्र (आप्पा) भेगडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, तळेगाव भाजपा शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगरसेवक श्रीराम कुबेर, लक्ष्मण माने, सुनील चव्हाण, युवा प्रबोधिनी अध्यक्ष रवी शेटे, विनीत भेगडे, वैभव कोतूळकर, किरण ओसवाल, अमोल भेगडे, ललित गोरे, सचिन राक्षे, संदेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते



















