पुणे (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतीनिधी, सुमित गायकवाड
दि.१४.११.२०२४
▪️डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन; जैन, गोर बंजारा समाजाचा प्रशांत सुदाम जगताप यांना पाठिंबापुणे- हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांना जैन, गोर बंजारा समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जगताप यांचे पारडे अधिक जड होत आहे. सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेले जगताप समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरले आहे.जैन सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शाह यांनी पाठिंबा देत मतदारसंघातील संपूर्ण जैन समाज जगताप यांच्या विजयासाठी सक्रिय असल्याचे आश्वस्त केले. गोर बंजारा समाजाच्या हितासाठी कार्यरत गोर सेना संघटनेच्या वतीनेही पाठिंबा जाहीर केला. पुणे शहरात भव्य असे गोर बंजारा भवन, तसेच येरवडा परिसरात क्रांतिकारी शूरवीर सद्गुरु सेवालाल महाराजांचा भारतातील पहिला पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी योगदान देण्याचा शब्द जगताप यांनी दिला.कात्रज येथील एकता तरुण मंडळास भेट देऊन परिसरातील नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माळवाडी येथील ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, वसंत मोरे, कल्पना थोरवे, रूपाली शेलार व सचिन शेलार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कात्रज येथील ग्लोरीया को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सभासदांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जगताप यांनी जाणून घेतले.राजस सोसायटी, निरंजन सोसायटी, महावीरनगर, विद्यानगर शिवशंभो गल्ली नंबर १, विघ्नहर्तानगर, माऊलीनगर, शेलारमळा, महादेवनगर, उत्कर्ष सोसायटी, आकाश दर्शन, कात्रज तलाव, वरखडेनगर, जोगेश्वरीनगर, वास्तुश्री सोसायटी, गुजरवस्ती, कात्रज गावठाण, फाटेआळी, किनारा हॉटेल, कात्रज चौक, जैन मंदिर पायथा, अय्यप्पा मंदिर लेन, अंजलीनगर, कल्पनाताई थोरवे यांचे ऑफिस, भगवा चौक, संतोष नगर, अंजुमन मज्जिद लेन, संतोषी माता मंदिर या भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला. ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत, तसेच माता-भगिनींकडून औक्षण करण्यात आले. खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समीर तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व सहकाऱ्यांची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत एकजुटीने काम करून आपण इतिहास घडवला, परिवर्तन घडवले. तीच एकजूट व तोच निर्धार विधानसभा निवडणुकीतही कायम असून आपण मिळून पुन्हा एकदा हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना विजयी करून परिवर्तन घडवू, असा विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.



















