पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०८.२०२२
भिमा कोरेगाव- छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यविधी करणारे शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १० आॕगस्ट २०२२ रोजी वढु बु तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस गायकवाड कुटुंबीयांच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाडुरंग गायकवाड, जयेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शुरयोध्दा गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, जयेश गायकवाड, कैलास गायकवाड, सुरेश गायकवाड ,रमेश गायकवाड, बळीराम गायकवाड, संदीप गायकवाड , रामदास लोखंडे ,सचिव भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती पुणे , यांच्यासह गायकवाड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.