पुणे (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२२.१२.१९
मावशी- यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन २०१९-२०मधे लांब उडी (मोठा गट) या स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा सांगवडे या शाळेचा विद्यार्थी कृष्णा हरिश्चंद्र केवट याने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला अाहे, गत वर्षी या मुलाने उंच उडी मधे जिल्ह्यातील याच स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता. प्रथम क्रमांक मिळवण्यात शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन त्याला लाभले त्यामुळॆ सगळ्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.



















