पुणे:(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.११.१८
आज पुणे येथे बुध्दीस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने भारतिय संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या २००० प्रतींचे वाटप संघटनेच्या वतीने नागरिकांना करणेत आले.प्रथम भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील स्मारकास संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तेथून पुढे संविधानांच्या प्रास्ताविकेचे वाटप सार्वजनिक ठिकाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य सरकारी कार्यालयांमध्ये करण्यात आले.यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष सुमित गायकवाड,अमित माने, अजय शिंदे, नितिन फडतरे,विरेंद्र गायकवाड, विकास ओव्हाळ यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदरील कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.एकाच वेळी राज्याच्या विविध भागातून बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम राबवून संविधान दिन साजरा होत असल्याची माहिती या प्रसंगी सुमित गायकवाड व अमित माने यांनी दिली.



















