कात्रज नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१३.०९.२०२६
पुणे- कात्रज नवीन बोगद्याजवळ आज (१३ सप्टे) पहाटे पावणे दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताची थरारक माहिती आता समोर आली आहे. अपघात नेमका कसा घडला, त्यानंतर घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती आणि मदतीसाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाला दुसऱ्या ट्रकने दिलेली धडक याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मदतकार्य सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या वाहनालाही दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ तपासणी अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.
कात्रज नवीन बोगदा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



















